शिवजयंतीनिमित्त सिडको-अंबड भगवेमय

By Admin | Updated: March 14, 2017 17:08 IST2017-03-14T17:08:18+5:302017-03-14T17:08:18+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको भगवेमय झाले.

CIDCO-Ambad Bhagwayam for the occasion of Shiv Jayanti | शिवजयंतीनिमित्त सिडको-अंबड भगवेमय

शिवजयंतीनिमित्त सिडको-अंबड भगवेमय

सिडको : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको भगवेमय झाले. पन्नासहून अधिक मंडळांनी शिवरायांची स्थापना केली असून, दहा मंडळांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. अंबड पोलिसांच्या वतीने मिरवणूक मार्गासह संपूर्ण परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सिडको व अंबड परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षीही परिसरात ठिकठिकाणी भगवे झेंडे व पताका लावून परिसर भगवामय करण्यात आला आहे. जुने सिडको, राणाप्रताप चौक, विजयनगर, गणेश चौक, सावतानगर, त्रिमूर्ती चौक यांसह अंबड गाव व परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सुमारे साठहून अधिक मंडळांनी मिरवणूक न काढता शिवजयंती साजरी करणार असून, सिडको व अंबडमधील सुमारे दहा मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. यात सिडको शिवजयंती उत्सव समिती, पवननगर येथील शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील पाटील, सिंहस्थनगर येथील छत्रपती प्रतिष्ठान मंडळाचे विनोद चव्हाण, गणेश चौक येथील गणेश चौक मित्रमंडळाचे विपुल देवांग, सोनवणे क्लासेस, शिवराणा प्रतिष्ठान, शिवबा फे्रं ड्स, शिवरत्न मित्रमंडळ, एसएफसी फाउंडेशन, शिल्पकार युवक मित्रमंडळ आदि मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा शुभारंभ उत्तमनगर येथून सायंकाळी होणार आहे. यानंतर राजरत्ननगर, पवननगर, रायगड चौक, सावतानगर, दिव्या अ‍ॅडलॅब मार्गे त्रिमूर्तीचौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

Web Title: CIDCO-Ambad Bhagwayam for the occasion of Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.