सिडकोत तडीपार गुंडास अटक
By Admin | Updated: September 12, 2016 01:36 IST2016-09-12T01:32:27+5:302016-09-12T01:36:32+5:30
सिडकोत तडीपार गुंडास अटक

सिडकोत तडीपार गुंडास अटक
नाशिक : पोलीस आयुक्तालयासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार किशोर बबन आव्हाड (२५, रा़ स्वराज्यनगर) यास अंबड पोलिसांनी रविवारी (दि़११) उत्तमनगर परिसरातून अटक केली़
शहरातून तडीपार करण्यात आलेले असतानाही पोलीस अधिकारी वा न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहरात फिरणाऱ्या आव्हाड याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या सहा ते आठ महिन्यांमध्ये नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेले अनेक गुंड पुन्हा शहरात येण्याचे प्रकार वारंवार घडत असून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.