सिडकोत तडीपार गुंडास अटक
By Admin | Updated: October 12, 2015 22:32 IST2015-10-12T22:26:57+5:302015-10-12T22:32:45+5:30
सिडकोत तडीपार गुंडास अटक

सिडकोत तडीपार गुंडास अटक
नाशिक : पोलीस आयुक्तालयासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला गुंड मनोज भानुदास मोगल (२९, रा़ ४, कृष्णकुंज अपार्टमेंट, पांडुरंगनगर, कामटवाडे, सिडको) हा रविवारी (दि़११) सिडको परिसरात आढळून आल्याने गुन्हे शाखेने त्यास अटक केली आहे़ गुन्हेगारी कारवायातील सहभागामुळे त्याच्यावर २० मार्च २०१४ रोजी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती़
पोलीस अधिकारी वा न्यायालयाची परवानगी न घेता शहरात आढळून आल्याने त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली आहे़ (प्रतिनिधी)