दंगलीची सीआयडी चौकशी करा

By Admin | Updated: October 17, 2016 01:06 IST2016-10-17T00:59:07+5:302016-10-17T01:06:05+5:30

आनंदराज आंबेडकर : नाशिक दौऱ्यात केली मागणी

CID inquest into riots | दंगलीची सीआयडी चौकशी करा

दंगलीची सीआयडी चौकशी करा

नाशिक : तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचाराची घटना दुर्दैवी असून, आरोपीस कठोर शिक्षा व्हायलाच हवी, मात्र या घटनेनंतर ग्रामीण भागात एका ठरावीक समाजाच्या नागरिकांना लक्ष्य केले जाते आहे. त्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन दंगलीची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
तळेगाव येथील पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय व दंगलीतील जखमींची आनंदराज आंबेडकर यांनी रविवारी (दि. १६) जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, कोपर्डी असो वा तळेगाव या दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, यातील आरोपी मग ते कोणत्याही समाजाचे असोत त्यांचे समर्थन होऊ शकत नाही; मात्र या घटनेनंतर विशेषत: ग्रामीण भागात उसळलेली दंगल ही काहींनी जाणीवपूर्वक घडवून आणली आहे यामुळे या दंगलीची चौकशी ही सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CID inquest into riots