पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लांबविली
By Admin | Updated: November 14, 2015 22:57 IST2015-11-14T22:56:49+5:302015-11-14T22:57:21+5:30
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लांबविली

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लांबविली
पंचवटी : कचरा फेकण्यासाठी जाणाऱ्या महिलेला रस्त्यात थांबवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी चाळीस हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने हिसकावून नेल्याची घटना कोणार्कनगर क्रमांक - १ येथे घडली आहे.
या घटनेबाबत भारती संजय झगडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कोणार्कनगर येथे झगडे यांचे मातोश्री अपार्टमेंट येथे दुकान असून, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्या कचरा फेकण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी लक्ष्मीमंदिर कोठे आहे तसेच समोरचे रो हाऊस कोणाचे आहे, अशी विचारणा करून झगडे यांना बोलण्यात गुंतवून दुचाकीवरील एका भामट्याने झगडे यांच्या गळयातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. दरम्यान, सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)