थेट सरपंच निवडीने चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST2017-09-26T22:59:11+5:302017-09-27T00:33:27+5:30
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

थेट सरपंच निवडीने चुरस
कळवण : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाºया तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबरला तालुक्यात मतदान होणार आहे. स्थानिक पुढाºयांसह त्यांना मानणाºया नेत्यांचीही प्रतिष्ठा यातून पणाला लागणार आहे. यंदा पहिल्यांदाच गावचा सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. लोकनियुक्त १४ गावांतील सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले आहे. ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार
कळवण खुर्द ३ प्रभागातील ९ जागा (बिनविरोध), जयपूर ३ जागांसाठी ७ जागा ( बिनविरोध) कोसुर्डे ३ प्रभागातील ९ जागांसाठी १६ उमेदवार, पिळकोस ३ प्रभागातील ९ जागांसाठी २२ उमेदवार, देसराणे ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १७ उमेदवार, मानूर ५ प्रभागांतील १३ जागांसाठी २९ उमेदवार, भादवण ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २३ उमेदवार, पाळे खुर्द ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २५ उमेदवार, वाडी बुद्रुक ४ प्रभागांतील ११ जागांसाठी २७ उमेदवार, बगडू ३ प्रभागांतील ७ जागांसाठी १३ उमेदवार, गोळाखाल ४ प्रभागांतील ११ जागांसाठी १९ उमेदवार, कुंडाणे (ओ) ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार, जयदर ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार, निवाणे ५ प्रभागांतील १३ जागांसाठी २५ उमेदवार, शिरसमणी ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २५ उमेदवार, तर सुळे ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीचे खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.
कळवण खुर्द, जयपूर बिनविरोध
कळवण खुर्द व जयपूर ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध होऊन कळवण खुर्द सरपंचपदी रत्ना पवार तर जयपूर सरपंचपदी मीनाक्षी गायकवाड यांची निवड झाली. कळवण खुर्द ग्रामपंचायतमध्ये लीलाबाई भाऊसाहेब शिंदे, किशोर वनजी गवळी, मंगला रमेश पवार, राहुल आनंदा गांगुर्डे, हितेंद्र शरद पगार, सविता भगवान शिंदे, मंगला महेश पवार व राजेंद्र कौतिक गवळी हे बिनविरोध निवडून आले असून, प्रभाग क्र मांक ३ मधील अनुसूचित जमाती स्त्री राखीव उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने जागा रिक्त राहणार आहे. तर जयपूर ग्रामपंचायतमध्ये सुनील पोपटराव गायकवाड, सुनीता पोपट बागूल, अनिल सोमनाथ पवार, ललीता देवचंद बागुल, बळीराम तुळशीराम खैर, ज्योती सुभाष चौधरी, इंदूबाई धनराज पाडवी यांची बिनविरोध निवड झाली.
१६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे आरक्षण
कळवण खुर्द ( अनुसूचित जमाती स्त्री) रत्ना लक्ष्मण पवार (बिनविरोध), जयपूर (अनुसूचित जमाती स्त्री) मीनाक्षी सुनील गायकवाड (बिनविरोध), कोसुर्डे (अनुसूचित जमाती), पिळकोस (अनुसूचित जमाती), देसराणे (अनुसूचित जमाती स्त्री), मानूर (अनुसूचित जमाती), भादवण (अनुसूचित जमाती, पाळे खुर्द (अनुसूचित जमाती), वाडी बुद्रुक (अनुसूचित जमाती), बगडू (अनुसूचित जमाती स्त्री), गोळाखाल (अनुसूचित जमाती स्त्री), कुंडाणे (ओ) अनुसूचित जमाती, जयदर (अनुसूचित जमाती स्त्री), निवाणे (अनुसूचित जमाती), शिरसमणी (अनुसूचित जमाती स्त्री), सुळे (अनुसूचित जमाती).