शहा विद्यालयात नाताळ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:35 IST2019-12-26T22:34:48+5:302019-12-26T22:35:33+5:30

सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्याने चॉकलेट वाटले. मुलांनी सांताक्लॉज बरोबर जिंगल बेल गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. साईराज करंडे या विद्यार्थ्याने मेरी ख्रिसमस गीत गात शुभेच्छा दिल्या.

Christmas school | शहा विद्यालयात नाताळ उत्साहात

शहा येथील भैरवनाथ विद्यालयात नाताळ सण साजरा करण्यात आला. यावेळी साई धट या विद्यार्थ्याने सांताक्लॉजचा वेष परिधान करुन उपस्थितितांची मने जिंकली.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्याने चॉकलेट वाटले. मुलांनी सांताक्लॉज बरोबर जिंगल बेल गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. साईराज करंडे या विद्यार्थ्याने मेरी ख्रिसमस गीत गात शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य सुनील गडाख, पर्यवेक्षक संजय जाधव, शमीरुल्ला जहागीरदार, नारायण वाघ, सलीम चौधरी, रमेश रौदळ, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रविंद्र कोकटे, बाळासाहेब कुमावत, राजेंद्र गवळी, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गुरु ळे, सचिन रानडे, रवींद्र डावरे, सुनील तासकर, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Christmas school