ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST2020-12-28T04:08:53+5:302020-12-28T04:08:53+5:30

नाशिक : ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस आहे. आपल्या जीवनात नेहमी नवीन, चांगल्या व सकारात्मक गोष्टी ...

Christmas festivities at the Brahmakumari Institute | ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस उत्साहात

ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस उत्साहात

नाशिक : ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस आहे. आपल्या जीवनात नेहमी नवीन, चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडाव्यात. सांताक्लॉज येऊन ज्याप्रमाणे सर्वांना गोड पदार्थ वाटतात, त्याप्रमाणे आपल्या जीवनातही गोडवा राहावा, अशा शुभेच्छा नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शक्तीदीदी यांनी उपस्थितांना दिल्या.

सेंट फिलोमिना स्कूलसमोरील सागर हेरिटेज इमारतीतील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील सभागृहात ख्रिसमस हा सण मोठ्या उल्हासाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी ब्रह्माकुमार दिलीप यांनी ख्रिसमस सणाची माहिती सांताक्लॉजचे रूप परिधान करून सांगितली. तर, ब्रह्माकुमार मोहन भाई यांनी ख्रिसमसचे गीत गायले. ब्रह्माकुमारी गोदावरीदीदी यांनी सर्व उपस्थितांना भेटवस्तू व प्रसादाचे वाटप केले. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो व आनंदी राहण्यास व नवीन काही शिकण्यासाठी प्रेरित करतो, असेही शक्तीदीदी यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमात मोजक्या संख्येने ब्रह्माकुमारी संस्थेचे नियमित साधक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित होते.

Web Title: Christmas festivities at the Brahmakumari Institute