फटाक्याच्या धुरामुळे मुलांच्या डोळ्यांना इजा
By Admin | Updated: October 26, 2014 22:43 IST2014-10-26T22:43:02+5:302014-10-26T22:43:19+5:30
फटाक्याच्या धुरामुळे मुलांच्या डोळ्यांना इजा

फटाक्याच्या धुरामुळे मुलांच्या डोळ्यांना इजा
संगमेश्वर : फटाके फोडल्यानंतर निघालेल्या धुरामुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास झाल्याने नेत्रतज्ज्ञांकडे धाव घ्यावी लागली.
दीपावलीच्या सणात आकाशकंदील, फराळ, नवे कपडे याबरोबरच फटाक्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. शोभेचे फटाके व मोठा आवाज करणारे बॉम्ब लक्ष्मीपूजनापासून मोठ्या प्रमाणावर मालेगावी शहरात फोडले जातात. आबालवृद्ध यात उत्साहाने सहभागी होतात. विशेषत: लहान मुलांचा तर शोभेचे फटाके फोडण्यावर भर असतो. फुलबाजे, भूईचक्कर, भूईनळे यासारखे प्रकाश देणारे शोभेचे फटाके फोडून दीपावलीचा सण साजरा केला जातो; मात्र, हे फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेकांच्या डोळ्यास त्रास जाणवू लागला. डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे असा त्रास अनेकांना झाला. विशेषत: लहान मुलांन याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याच्या घटना शहरात घडल्या. त्रास झालेल्यांना शहरातील नेत्रतज्ञांकडे धाव घ्यावी लागली. डॉक्टरांनी यावर उपचार केल्याने डोळ्यांना आराम पडल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)