विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

By Admin | Updated: October 20, 2016 00:24 IST2016-10-20T00:17:14+5:302016-10-20T00:24:47+5:30

संतोष श्रमिक महाविद्यालय : रोलर हॉकी, व्हॉलीबॉल, हॉकी स्पर्धा

The choice of students at the state level | विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

येवला : जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक व युवक सेना यांच्या वतीने विभागस्तरीय शालेय रोलर हॉकी, व्हॉलीबॉल, हॉकी या स्पर्धेत बाभुळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
नाशिक येथील के. एन. केला महाविद्यालय येथे हॉकी स्पर्धा पार पडल्या. अमळनेर येथे विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धा तसेच नाशिकला राजे संभाजी स्टेडियम येथे रोलर हॉकी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत चार जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
यशस्वी खेळाडूंना क्र ीडाशिक्षक सागर मुटेकर, अनिल शिंदे, राधिका कुक्कर, कैलास गायकवाड, राहुल खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या खेळाडूंचा जिल्हा बँकेचे संचालक व संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे, प्राचार्य जी. एस. येवले, उपप्राचार्य ए. जी. कदम, विभागप्रमुख संतोष विंचू, विठ्ठल परदेशी, दत्तात्रय खोकले, प्रदीप पाटील, शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन मुंढे, राहुल भालेराव, हरी भामरे, दादासाहेब गायकवाड, किरण पैठणकर, किरण गायकवाड, मनोज खैरे, राहुल गोलाईत, भाऊसाहेब अनर्थे, नवनाथ जाधव, अरुण जाधव, अजित देठे, तुषार जेजूरकर आदिंनी सत्कार
केला. (वार्ताहर)

Web Title: The choice of students at the state level