तिढा सुटला : स्थायीसह विषय समित्यांच्या सदस्यांची निवड बिनविरोध? आजच्या सभेत घोषणा शक्य
By Admin | Updated: November 15, 2014 00:18 IST2014-11-15T00:17:37+5:302014-11-15T00:18:06+5:30
तिढा सुटला : स्थायीसह विषय समित्यांच्या सदस्यांची निवड बिनविरोध? आजच्या सभेत घोषणा शक्य

तिढा सुटला : स्थायीसह विषय समित्यांच्या सदस्यांची निवड बिनविरोध? आजच्या सभेत घोषणा शक्य
नाशिक : बहुचर्चित स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी असलेली चुरस संपल्याचे वृत्त असून, शनिवारी (दि. १५) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादीच्या शैलेश सूर्यवंशी व बाळासाहेब गुंड यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता ही विशेष सर्वसाधारण सभा होत असून, या सभेत स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसह आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याणसह अन्य विषय समित्यांच्या विविध २३ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सुरुवातीलाच स्थायी समितीच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीकडून संगीता राजेंद्र ढगे, शैलेश सूर्यवंशी व बाळासाहेब गुंड तसेच भाजपाकडून मनीषा बोडके व कॉँग्रेसकडून सुनीता अहेर यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात सुनीता अहेर यांच्या अर्जाबाबत प्रशासन अनभिज्ञ असून, संगीता ढगे यांची पक्षनेतृत्वाने समजूत काढल्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर मनीषा बोडके यांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने स्थायीसह सर्वच विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)