उमेदवारांचे नाव, फोटो असलेल्या चिठ्ठया जप्त; पोलीसांचा दणका
By Admin | Updated: February 21, 2017 11:55 IST2017-02-21T11:55:09+5:302017-02-21T11:55:09+5:30
शहरातील सातपूर, जुने नाशिक, सिडको, नाशिकरोड, पंचवटी भागांमध्ये काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या हातात नाव, मतदान केंद्र, बुथ क्रमांक
उमेदवारांचे नाव, फोटो असलेल्या चिठ्ठया जप्त; पोलीसांचा दणका
नाशिक : शहरातील सातपूर, जुने नाशिक, सिडको, नाशिकरोड, पंचवटी भागांमध्ये काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या हातात नाव, मतदान केंद्र, बुथ क्रमांक, यादी भाग क्रमांक आदि माहिती उमेदवार व पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठयांवर लिहून देत प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला; मात्र सदर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरावर मतदार याद्या घेऊन बसलेल्या विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत राजकिय पक्ष, चिन्ह, उमेदवारांची नावे असलेल्या चिठ्ठया जप्त केल्या आहेत. एकूणच सदर चिठ्ठया मतदारांच्या हाती देऊन एकप्रकारे राजकिय उमेदवारांकडून ‘डाव’ खेळला जात असल्याचे चित्र विविध केंद्रांच्या परिसरात दिसत होते.