शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

फाळके स्मारकात महापालिका भागीदारीत साकारणार चित्रनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:40 IST

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे. 

ठळक मुद्देअखेर मुहूर्त : सोमवारी निविदा निघणार

नाशिक :  चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महापालिकेने १९९९ मध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी फाळके आणि बौद्ध स्मारक साकारले. निसर्गरम्य वातावरणात साकारलेले फाळके यांचे स्मारक हे पर्यटन स्थळ झाले. त्याठिकाणी चित्रनगरी सुरू करण्याची घोषणा त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी केली; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तसेच कैलास जाधव यांनीही हा विषय पटलावर घेतल्यानंतर त्याला गती मिळाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई आणि तत्सम मान्यवरांशी बेालून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फाळके स्मारकाचे रूपडे पालटवले जाणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने आता तयारी सुरू केली असून पीपीपी म्हणजेच खासगी भागीदारीतून त्याचे रूपडे पालटवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी निविदा मागवण्यात येणार आहे.  मनपाला उत्पन्नही मिळणारमहापालिकेने स्वत: फाळके स्मारक चालवले होते. त्यावेळी सुरुवातीला उत्पन्न हे खर्चापेक्षा अधिक होते नंतर मात्र त्याची रया गेली. आता स्मारकाची देखभालदेखील करणे महापालिकेला अशक्य झाले आहे. त्यामुळे खासगी भांडवल गुंतवणुकीतून महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPhalke smarakफाळके स्मारक