शाह विद्यालयात चिंतन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:46+5:302021-02-23T04:21:46+5:30

मालेगाव : येथील वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री. र. वी. शाह माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन ...

Chintan Din celebrated at Shah Vidyalaya | शाह विद्यालयात चिंतन दिन साजरा

शाह विद्यालयात चिंतन दिन साजरा

मालेगाव : येथील वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री. र. वी. शाह माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनानिमित्ताने सोमवारी (दि. २२) चिंतन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विवेक कासार होते. यावेळी एस. पी. बेलन, व्ही. पी. आर्वीकर, टी. के. देसले उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रारंभी लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्काऊट गाईडची प्रार्थना विद्यार्थ्यांनी म्हटली. मुख्याध्यापक कासार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आर्वीकर यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांचा कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Chintan Din celebrated at Shah Vidyalaya