‘रंगालय’मध्ये रविवारी ‘कृष्णविवर’
By Admin | Updated: April 23, 2015 23:35 IST2015-04-23T23:35:18+5:302015-04-23T23:35:58+5:30
‘रंगालय’मध्ये रविवारी ‘कृष्णविवर’

‘रंगालय’मध्ये रविवारी ‘कृष्णविवर’
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘रंगालय’ या उपक्रमात येत्या रविवारी (दि.२६) कल्याण येथील ‘अभिनय’ या संस्थेच्या वतीने ‘कृष्णविवर’ या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सायंकाळी ७ वाजता हे नाटक होईल. या नाटकाचे लेखन नाशिकच्या दत्ता पाटील यांनी केले असून, अभिजित झुंजारराव यांनी दिग्दर्शन केले आहे. नाट्यनिर्माता संघाची अनेक पारितोषिके पटकावणारा हा दीर्घांक समाजाची सद्यस्थिती मांडतानाच त्यातून व्यक्तिगत आयुष्याचा धांडोळा घेतो. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या या नाटकात दीप्ती चंद्रात्रे व नेहा अष्टपुत्रे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रकाशयोजना जयदीप आपटे यांची, तर संगीत विराट जयवंत यांचे आहे.