मोहपाडा येथे चिमुकल्यांचा बाजार

By Admin | Updated: March 20, 2016 23:51 IST2016-03-20T23:18:13+5:302016-03-20T23:51:01+5:30

मोहपाडा येथे चिमुकल्यांचा बाजार

Chinmukalai market at Mohpada | मोहपाडा येथे चिमुकल्यांचा बाजार

मोहपाडा येथे चिमुकल्यांचा बाजार

 पेठ : सर्वत्र एकच लगबग, प्रत्येकाची अपेक्षित जागा पकडण्याची घाई, आपलाच माल जास्त विकला जावा यासाठी केलेला आरडाओरडा, गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी लढवलेल्या विविध क्लृप्त्या... एरवी मोहपाड्याच्या प्राथमिक शाळेच्या आवारातील शांत वातावरण
शनिवारी अक्षरश: आठवडे बाजाराने गजबजून गेलेल होते़ हा बाजार भरवला होता शाळेच्याच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी़
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी मोहपाडा येथील शाळेच्या आवारात मुलांनी बाजारपेठ स्थापली़ कोणी कांदे तर कोणी पपई विकायला आणली, शेवग्याच्या शेंगा, चिंचा, बोरे, कोबी यांसह स्थानिक परिसरात मिळणाऱ्या वस्तूही बाजारात मांडण्यात आल्या होत्या़ योग्य वजन करून त्याचा भाव ठरवत पैसे मोजून घेताना विद्यार्थी दिसून येत होते़ पालकांनीही या बाजाराचा चांगलाच आनंद घेतला़ आपल्याच आईवडिलांना भाजी विकताना मुलांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाची लकेर दिसून येत होती़ मुख्याध्यापक भास्कर जाधव, जयदीप गायकवाड, रवींद्र खंबाईत, रेणुका पाटील, निर्मला चव्हाण आदि शिक्षक बाजारपेठेत लक्ष ठेवत असताना त्यांनाही खरेदीचा मोह झाला़ आपल्याच विद्यार्थ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन त्याला व्यावहारिक ज्ञान दिले जात होते़ दिवसभराच्या स्वकमाईने मुलेही आनंदित झाली़ गावातील नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला़ (वार्ताहर)

Web Title: Chinmukalai market at Mohpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.