चिन्मय उदगीरकर निवडणूक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:14 AM2019-10-16T01:14:08+5:302019-10-16T01:16:17+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे.

Chinmay Udgirkar Election Brand Ambassador | चिन्मय उदगीरकर निवडणूक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

चिन्मय उदगीरकर निवडणूक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

googlenewsNext

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. प्रचाराचा ज्वर वाढत असताना जिल्हा प्रशासनही मतदारांपर्यंत पोहोचून त्यांनी मतदानासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मोहिमेसाठी अभिनेता चिन्मय उदगीरकर मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती करण्यात आलेली आहे. महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉॅइंट लावण्यात आलेले आहेत, तर अलीकडेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून ‘आमच्या सक्षम भवितव्यासाठी मतदान करा’ असे आवाहन करणारे पत्र लिहिण्याचा उपक्रम जिल्हा निवडणूक शाखेने राबविला आहे.
याच प्रचारप्रसारच्या मोहिमेतून नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उद््गीरकर यांचे नाव पुढे आले आणि त्यांना निवडणुकीचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर करण्यात आले. जिल्ह्यात सध्या सर्वच मतदारसंघांमध्ये जिल्हा प्रशासन जनजागृती मोहिमेवर भर देत आहे.
आता अभिनेता उद्गीरकर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी आवाहन करताना दिसणार आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत अगोदर त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर शहर परिसरातील अनेक ठिकाणी रॅली काढून मतदारांना आवाहन केले जाणार आहे.

Web Title: Chinmay Udgirkar Election Brand Ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.