चिंचवेत घरफोडी; पावणेदोन लाख लंपास

By Admin | Updated: February 10, 2016 00:07 IST2016-02-10T00:06:19+5:302016-02-10T00:07:18+5:30

चिंचवेत घरफोडी; पावणेदोन लाख लंपास

Chinchate burglary; Pavadon Million Lampas | चिंचवेत घरफोडी; पावणेदोन लाख लंपास

चिंचवेत घरफोडी; पावणेदोन लाख लंपास

मालेगाव : तालुक्यातील चिंचवे येथे शेतकऱ्याच्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ८० हजारांची रोकड लंपास केली. वडनेर खाकुर्डी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काल सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान ही घटना घडली. विठ्ठल काळू खैरनार (६२) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील दाराची आतून लावलेली कडी तोडून आत प्रवेश केला. खोलीत ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीचा पत्रा उचकटून त्यात ठेवलेले एक लाख ८० हजार रूपयांची रोकड लंपास केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक नाईक करीत आहेत.

Web Title: Chinchate burglary; Pavadon Million Lampas