चणकापूर उजव्या कालव्याला भगदाड

By Admin | Updated: September 7, 2016 01:03 IST2016-09-07T01:02:57+5:302016-09-07T01:03:06+5:30

देवळा : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

Chinchapura right-awaited break in the canal | चणकापूर उजव्या कालव्याला भगदाड

चणकापूर उजव्या कालव्याला भगदाड

 देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला भऊर फाट्याजवळ भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. मात्र पाटबंधारे विभागाला यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. कालवा फुटल्यामुळे कालव्याच्य वरील भागात पाणी इतरत्र वळविण्यात आले आहे.
चणकापूर ते रामेश्वर या कालव्याच्या वहनक्षमतेवरून नेहमीच आरोप प्रत्यारोप होत आलेले आहेत. या कालव्याची वहनक्षमता कमी असल्याने देवळा तालुक्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याची तालुक्यातील जनतेची तक्रार आहे. कालव्याला पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पाटबंधारे विभागाला ही गळती थांबविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते. कालवा दुरूस्त करून पाणी पुर्ववत सुरू करावे, अशी मागणी जनतेकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Chinchapura right-awaited break in the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.