भिकारी महिलेच्या मृत्यूने चिमुरडी अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST2021-05-18T04:16:12+5:302021-05-18T04:16:12+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात भीक मागणाऱ्या महिलेचा (वय अंदाजे २६) मृत्यू झाल्याने तिची दीड वर्षाची मुलगी अनाथ झाली आहे. दीड ...

Chimurdi orphaned by the death of a beggar woman | भिकारी महिलेच्या मृत्यूने चिमुरडी अनाथ

भिकारी महिलेच्या मृत्यूने चिमुरडी अनाथ

नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात भीक मागणाऱ्या महिलेचा (वय अंदाजे २६) मृत्यू झाल्याने तिची दीड वर्षाची मुलगी अनाथ झाली आहे. दीड वर्षाच्या अनाथ झालेल्या मुलीला उंटवाडी अभिक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.

मयत महिलेचे नाव पूजा जनार्दन सुलभोन असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती गुलाबवाडीत राहात होती. असे समजल्यावर रेल्वे पोलिसांनी वस्तीत जाऊन शोध घेतला. मात्र, नातेवाइकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. ही महिला स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. गेल्या १७ एप्रिलला रेल्वे तिकीट बुकिंगजवळ ती बेशुध्दावस्थेत पोलिसांना आढळली. त्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना १३ मे रोजी तिचे निधन झाले. ही महिला अंगाने सडपातळ असून, चेहरा लांबट, नाक सरळ आहे. तिने साडी नेसलेली आहे. तिच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू भोये यांनी केले आहे. पुढील तपास साहाय्यक उपनिरीक्षक एम. एम. पारधी करत आहेत.

Web Title: Chimurdi orphaned by the death of a beggar woman