ट्रॅक्टरमध्ये सापडून बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 24, 2014 00:34 IST2014-06-23T23:44:07+5:302014-06-24T00:34:17+5:30
तळवाडे दिगर : शेमळी येथे ट्रॅक्टरने शेतीची मशागत सुरू असताना ट्रॅक्टरवर आपल्या वडिलांसोबत बसलेल्या दोन वर्षांचा बालक रोटरमध्ये सापडून ठार झाला.

ट्रॅक्टरमध्ये सापडून बालकाचा मृत्यू
तळवाडे दिगर : शेमळी येथे ट्रॅक्टरने शेतीची मशागत सुरू असताना ट्रॅक्टरवर आपल्या वडिलांसोबत बसलेल्या दोन वर्षांचा बालक रोटरमध्ये सापडून ठार झाला.
किरण सोनवणे आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या रोटरने मशागत करीत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा पीयूषने ट्रॅक्टरवर बसण्याचा हट्ट धरला. पीयूष यास ट्रॅक्टरवर बसवून आपले काम सुरू ठेवले. पीयूष याचा ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने रोटरमध्ये सापडून ठार झाला.
ट्रकची टेम्पोला धडक; तरूण ठार
ंमालेगाव : चाळीसगाव - चिंचगव्हाण फाट्याजवळ ट्रकने टेम्पोला कट मारून झालेल्या अपघातात सायनेतील सोमनाथ कल्याण सोनवणे हा तरुण ठार झाला. त्याच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
हवालदार राजपूत यांनी फिर्याद दिली. जितेंद्र शांतीलाल सोनवणे रा. सायने याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक (एमएच ४१ जे ५६९१) ही चाळीसगावकडून मालेगावकडे भरधाव वेगात चालवून नेताना टेम्पो क्रमांक (एमएच १८ एम ५७९६) ला कट मारून अपघात केला. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.