थोरात विद्यालयात बालसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:08 AM2021-02-14T00:08:25+5:302021-02-14T00:24:31+5:30

जानोरी : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत बालसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.व्ही. खुर्दळ होते.

Children's meeting at Thorat Vidyalaya | थोरात विद्यालयात बालसभा

थोरात विद्यालयात बालसभेत मार्गदर्शन करतांना एस.एस. घोलप समवेत एस.व्ही. खुर्दळ, वंदना पाटील, सुभाष पाटील.

Next

जानोरी : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत बालसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.व्ही. खुर्दळ होते.

बालसभेच्या पर्यवेक्षिका वंदना पाटील व शिक्षणविस्तार अधिकारी एस. एस. घोलप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सकारात्मक मागण्याचा विचार करावा, यामध्ये शाळेत येण्यासाठी सायकल, स्कूल बस हवी. गावात वाचनालय, क्रीडांगण, संगीत वर्ग हवे आदी मागण्या गावाकडे मांडाव्या व पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे सांगितले.

विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या परिस्थितीचा चांगला अभ्यास करावा. विद्यार्थी दशेतच आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने वाटचाल करावी व आपल्या गावासाठी, देशासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा प्राचार्य खुर्दळ यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन रामनाथ गडाख यांनी व आभार प्रदर्शन शरद निकम यांनी केले.
 

Web Title: Children's meeting at Thorat Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.