बच्चे कंपनीला ३४ दिवस सुटी

By Admin | Updated: April 8, 2016 00:02 IST2016-04-07T22:25:19+5:302016-04-08T00:02:42+5:30

मज्जाच मज्जा : १ मे रोजीच जाहीर होणार निकाल

Children leave the company for 34 days | बच्चे कंपनीला ३४ दिवस सुटी

बच्चे कंपनीला ३४ दिवस सुटी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात झाली असून, १ मे रोजी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर २ मे पासून ४ जूनपर्यंत शाळांना ३४ दिवस उन्हाळी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा २ ते १७ एप्रिल दरम्यान सुरू आहेत. त्यानंतर केवळ प्राथमिक शिक्षकांना शालेय कामकाजासाठी प्राथमिक शाळांमध्ये हजेरी लावणे आवश्यक असून, या काळात विद्यार्थ्यांना शाळेत येणे ऐच्छिक ठेवण्यात आल्याचे समजते. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर लगेचच वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. २ मेपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना सुटी देण्यात आली असून, ४ जूनपर्यंत ही ३४ दिवसांची सुटी राहणार आहे. प्राथमिक शाळा उघडल्यानंतर ६ ते १० जून दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ जूनपर्यंत या सर्वेक्षणानुसार अहवाल तयार करून तोे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना सादर करावा लागणार आहे. मागील वर्षी उन्हाळी सुटी ९ मेपासून जाहीर करण्यात आली होती. यावर्षी मात्र ही सुटी
(दि. २) सात ते आठ दिवस लवकर सुरू होणार आहे. तसेच १३ जूनला उघडणारी शाळा यावर्षी ६ जूनपासून उघडणार आहे. ५ जूनला रविवार असल्याने जि.प.च्या शाळा ६ जूनला उघडतील. (प्रतिनिधी)

Web Title: Children leave the company for 34 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.