डुकराच्या हल्ल्यात बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 23:45 IST2016-03-25T23:02:17+5:302016-03-25T23:45:01+5:30
डुकराच्या हल्ल्यात बालक जखमी

डुकराच्या हल्ल्यात बालक जखमी
नाशिक : दिंडोरीरोडवर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालकाला डुकराने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २५) दुपारच्या सुमारास घडली़ जखमी झालेल्या बालकाचे नाव आर्यन संभाजी सोनवणे असे असून तो वज्रेश्वरीनगरमध्ये राहतो़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन दुपारी तीन वाजेच्या सुमारास मित्रांसमवेत खेळत असताना डुकराने अचानक त्याच्यावर हल्ला करून तोंडाचा चावा घेतला़ शेजारी असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी त्याची सुटका केली़ तर गंभीर जखमी आर्यनची आई शिवानी यांनी त्यास उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले़