IAS-IPS अधिका-यांच्या मुलांचा दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा
By Admin | Updated: March 28, 2017 11:21 IST2017-03-28T10:52:58+5:302017-03-28T11:21:14+5:30
नाशिकच्या इगतपुरीमधील मिस्टी व्हॅलीतील एका बंगल्यामध्ये उच्चभ्रू कुटुंबातील मुलांनी दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.

IAS-IPS अधिका-यांच्या मुलांचा दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 28 - नाशिकच्या इगतपुरीमधील मिस्टी व्हॅलीतील एका बंगल्यामध्ये उच्चभ्रू कुटुंबातील मुलांनी दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. महत्वाचं म्हणजे या पार्टीमध्ये आयएएस, आयपीएस अधिका-यांची मुले होती अशी माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिली आहे.
ड्रग्ज आणि दारु पिऊन या मुलांनी धिंगाणा घातला होता. त्याचा त्रास होत असल्याने शेजारी रहाणा-या नागरीकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करुन या मुलांना अटक केली.
महत्वाचं म्हणजे अटक केल्यानंतर या मुलांची लगेच जामिनावरही सुटका झाली. सुटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याची माहिती आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदूरबार येथील बडया सरकारी अधिका-यांची ही मुले असल्याची माहिती आहे.