शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी बालकांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: October 2, 2016 22:36 IST

दुर्लक्ष : सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची महामार्गावर कसरत

ओझर : येथील महामार्गाच्या पलीकडे असलेल्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची दिवसातून दोनदा कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगामुळे बालकांचे जीवन धोक्यात आले असून, दररोज होणाऱ्या या त्रासापासून कधी सुटका होईल, असा सवाल विचारला जात आहे.रस्त्याच्या पलीकडे असलेले सुमारे २१०० विद्यार्थी हे माधवराव बोरस्ते विद्यालय तसेच अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम यांचे दोन हजार विद्यार्थी तसेच नवीन इंग्रजी शाळेतले सहाशे विद्यार्थी, मराठी शाळेतले दोनशे विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करतात. येथील नवीन इंग्रजी शाळेजवळील असलेला भुयारी मार्ग संपूर्ण हगणदारीसाठी वापरला जात होता. मुलांना तेथून ये-जा करणे अशक्य बनले होते. आता तेथे दोन्ही बाजूस गेट बसवून पेव्हर ब्लॉकचे कामदेखील केले आहे. येथील छोट्या पुलाला कठडे नाहीत. भुयारी मार्गदेखील निरु पयोगी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी शाळेच्या वेळेत उपलब्ध असतात. परंतू ही रहदारी या दोघांच्या आवाक्याबाहेरची आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीला तोंड देत विद्यार्थी शाळेत पोहोचत आहेत. अनेक वेळा येथे अपघातदेखील झाले असून, मागे अनेक दिवस या संदर्भात निवेदन देऊन झाले, मोर्चे काढण्यात आले, पत्रव्यवहार झाले, यात अनेक राजकारणीदेखील सामील झाले परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च असून, शासन अजून किती अपघातांची वाट पाहत आहे, प्रशासनास कधी जाग येईल, असा सवाल येथील पालकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)