शटरमधील वीज प्रवाहाने घेतला बालकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:02+5:302021-07-17T04:13:02+5:30
शेख अनस शेख लतीफ बाबू (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी (दि.१५) रात्री आठ ...

शटरमधील वीज प्रवाहाने घेतला बालकाचा बळी
शेख अनस शेख लतीफ बाबू (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी (दि.१५) रात्री आठ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सलामताबाद चौकात मोबाईल दुकानाच्या शटरमध्ये वीज प्रवाह उतरला. रात्री एका मुलासह दोन जण जखमी होऊनदेखील मोबाईल दुकानाच्या मालकाने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे रात्रभर शटरमध्ये वीजप्रवाह तसाच सुरू होता. सकाळी दंतमंजन विकणारा आल्याने मोबाईल दुकानाजवळ गर्दी जमली. त्यात शेख अनस शेख लतीफ बाबू याचा पाय शटरवर पडला, त्याच्या पायात चप्पल नसल्याने त्याला विजेचा धक्का बसून जागीच त्याचा मृत्यू झाला. सामान्य रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. रात्री उशिरा त्याचा दफनविधी करण्यात आला. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मनपाच्या विद्युत विभागाने अशा धोकादायक विद्युत ताराचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.