मुलाविरूध्द बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी; पित्याची आत्महत्या
By Admin | Updated: January 7, 2017 18:54 IST2017-01-07T18:54:50+5:302017-01-07T18:54:50+5:30
दोघा महिलांनी पंचवटी परिसरातील एका इसमास वारंवार फोनवरुन धमकावत मुलाविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याने सदर इसमाने आत्महत्या केली.

मुलाविरूध्द बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी; पित्याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ७ - पुणे व धुळे शहरात राहणा-या दोघा महिलांनी पंचवटी परिसरातील एका इसमास वारंवार फोनवरुन धमकावत मुलाविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याने सदर इसमाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ परिसरातील पुष्पकनगरमधील विश्वेश्वर अपार्टमेंटमध्ये रेखा अनिल खैरनार या कुटुंबासमवेत राहता. त्यांचे पती अनिल शांताराम खैरनार (५४) यांना पुणे व धुळे मध्ये राहणाºया दोघा महिलांनी वारंवार फोन करुन मानसिक त्रास दिला . तसेच ‘तुझा मुलाविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करु व आम्ही आत्महत्त्या करु’ अशी धमकी दिली. मुलाच्या बदनामीच्या भीतीपोटी अनिल खैरनार यांनी २२ नोव्हेंबर रोजी यांनी आत्महत्त्या केली. पतीच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर रेखा यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून पूण्याची संशयित महिला पुनम रविंद्र बुवा तर धुळे येथील साळुंके (पूर्ण नाव माहित नाही) या दोघींविरुध्द मानसिक छळ करत आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शुक्रवारी (दि.६) रात्री साडे दहा वाजता दाखल केला.
संशयित दोन्ही महिलांकडून वारंवार अनिल यांना फोनवरुन धमकाविले जात होते. त्यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून माझे पती अनिल खैरनार यांनी आत्महत्त्या केल्याचे रेखा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बेडवाल करीत आहेत.