छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्त्या

By Admin | Updated: August 30, 2016 00:55 IST2016-08-30T00:53:57+5:302016-08-30T00:55:17+5:30

छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्त्या

Child Suicide | छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्त्या

छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्त्या


सिन्नर : येथील तानाजी चौकात राहणाऱ्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली.
पायल ईश्वरसिंग सोलंकी (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. नववी इयत्तेत शिकणारी पायल सकाळी खासगी शिकवणीला गेली होती. ती घरी आल्यानंतर आई मंदिरात गेल्याने घरात कोणी नव्हते. तेव्हा पायलने छताला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून तिला दोन मुले त्रास देत होते. यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर दोन संशयितांविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास व्यवहारे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Child Suicide