शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

बाल येशू यात्रा : अवजड वाहने शनिवारपासून पुणे महामार्गावर धावू शकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:53 IST

सालाबादप्रमाणे उपनगर येथे बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव दाखल होतात.

ठळक मुद्देअवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव

नाशिक : येत्या शनिवारपासून (दि.९) पुणे महामार्गावरील उपनगर येथे दोन दिवसीय बाल येशु यात्रा सुरू होणार आहे. यानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना उपआुयक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी जाहीर केली आहे.सालाबादप्रमाणे उपनगर येथे बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव दाखल होतात. यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन कुठलीही दुर्घटना घडू नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. सिन्नरकडून उपनगरमार्गे द्वारकेकडे जाणारी अवजड वाहने बिटको चौकातून डावीकडे वळण घेत पुढे देवळाली गाव, विहितगावमार्गे वडनेरगेट येथून वळण घेत पाथर्डीफाट्यावरून मुबंईकडे रवाना होतील. तसेच द्वारके कडून सिन्नर, पुणेकडे जाणारी अवजड वाहने विजय-ममता फेम सिग्नलवरून डावीकडे वळण घेत रामदास स्वामी मार्गाने थेट औरंगाबादनाका, लाखलगाव टी-पॉइंटवरून नांदूरनाकामार्गे पुढे मार्गस्थ होतील. तसेच पुणे, सिन्नरकडून येणारी अवजड वाहतूक धुळेकडे जाण्यासाठी शिंदेगावातून चांदगिरी, कोटमगाव येथून (उजवीकडे वळण) औरंगाबादरोडने नांदूरनाका, जत्रा चौफूलीवरून पुढे रवाना होतील. या अधिसूचनेचे पालन सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांची वाहतूक करणा-या वाहनचालक-मालकावर बंधनकारक आहे. हे निर्बंध शनिवारी सकाळी सहा ते रविवारी रात्री अकरा वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीसhighwayमहामार्ग