दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथे गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रान डुकरांनी केलेल्या हल्लात बारा वर्षीय बालक जखमी झाले. तन्मय संजय पेलमहाले हा बालक विहिरीवर गेला असता तेथे रानडुकरांचा मोठा कळप आला. त्या कळपाने या बालकावर हल्ला चढविला. त्यास उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बालकाच्या छातीवर हल्ला केला आहे. रानडुकरांचा कळप गेल्या तीन ते चार दिवसांपासून निळवंडी, हातनोरे, पाडे परिसरात धुमाकूळ घालत आहे.
रानडुकरांच्या हल्ल्यात बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:13 IST