शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 09:59 IST

देवळाली कॅम्प : झोळीत झोपलेल्या एक वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली. बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेवरही कुत्र्याने हल्ला चढविल्याने माताही गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या क्रूरतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

ठळक मुद्देधक्कादायक घटना पिसाळलेल्या कुत्र्याचा मातेवरही हल्ला; बिटको रुग्णालयात उपचार सुरू

देवळाली कॅम्प (नाशिक) : झोळीत झोपलेल्या एक वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली. बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेवरही कुत्र्याने हल्ला चढविल्याने माताही गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या क्रूरतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.नाशिकरोडपासूनच अगदी जवळ सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील कारखाना रोडवरील एका वीटभट्टीवर पवार दाम्पत्य काम करीत असताना त्यांच्या समोरच सदर हादरून सोडणारी घटना घडली. ऋषी पवार आणि त्यांची पत्नी जनाबाई पवार हे वीटभट्टीवर काम करीत असताना त्यांनी आपले एक वर्षीय बाळ कांचन याला झाडाला बांधलेल्या झोळीत झोपविले होते. कामात मग्न असतानाच जनाबाई यांना बाळाचा जोरजोरात रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी धाव घेतली असता पिसाळलेला कुत्रा बाळाचा चावा घेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड करीत कुत्र्याच्या तावडीतून बाळाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याने त्यांच्या हाताचा लचका तोडून पळ काढला. जनाबाई यांनी जखमी अवस्थेतच बाळाला जवळ घेतले, परंतु बाळाचा रडण्याचा आवाज येत नसल्याने त्यांनी त्याला हृदयशी कवटाळून जोरात हंबरडा फोडला.

त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीला धावले आणि त्यांनी आई आणि बाळ या दोघांनाही नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, पवार कुटुंबिय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही.बिबट्यांची भीती, आता कुत्र्यांची दहशतशहरालगतच्या शेती आणि मळे परिसरात बिबट्यांचा संचार असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गावातील नागरिकही प्रत्यक्षदर्शी आहेत. भगूर, लहवित, नाणेगाव परिसर असो की शिंदे, पळसे, पंचवटी परिसरातील मळे तसेच पाटाचा परिसर, सातपूर जवळच्या पिंपळगाव खांब असे शहराच्या चारही बाजूला बिबट्याचे वास्तव्य आढळून येत असल्याने बिबट्याची भीती आहे. त्यामुळे शेतावर काम करण्यासही मजूर घाबरत असतात. आता तर कुत्र्यांची भीती वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरातील कुत्रे गावात?ाानेगाव-वडगाव मळे परिसरात महापालिकेने सोडलेल्या मोकाट कुत्र्यांनी कांचनचा बळी घेतल्याचा आरोप आता परिसरातील नागरिक करीत आहेत. पंचक्रोशीत अनेक गावांतील नागरिकांची मोकाट कुत्र्यांविषयी तक्रार असताना महापालिकेनेच असे मोकाट कुत्रे सोडताना खबरदारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnmmcनवी मुंबई महापालिका