बालकांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:11 AM2019-11-14T00:11:22+5:302019-11-14T00:12:01+5:30

नाशिक : ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून आकाशाला गवसणी घातली आहे. अनेक माध्यमांतून आणि अभ्यासातून मुलांनी स्वत:ला सिद्ध करताना आपली आणि आपल्या शाळा, महाविद्यालयांचा लौकिकदेखील वाढविला आहे. देशाचे भवितव्य म्हणून मुलांकडे पाहिले जात असल्याने त्यांच्याकडून अशा कामगिरीचेही कौतुक होणे अपेक्षित आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर प्रत्यक्षात साकारलेल्या संशोधनातून या मुलांनी स्वत:च्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यांच्या या भरारीची घेतलेली दखल...

 Child Artist | बालकांचा कलाविष्कार

बालकांचा कलाविष्कार

Next

नाशिक : शहरातील बाल संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात गगनभरारी घेत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या समस्या आणि आव्हानांचा विचार करून २५० ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजनाचे ड्रोन तयार करून भारतातील अव्वल ३० प्रकल्पांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील विद्यार्थी रोशन शिलावट, यशपाल गुप्ता आणि रोहित माळोदे यांनी ‘माध्यम आणि करमणूक’ या विषयांतर्गत ‘डिसेंट वर्क अ‍ॅण्ड इकोनोमिक ग्रोथ’ तर दिया गुजराथी, अमृता जाधव आणि मोक्षदा चिरमाडे या विद्यार्थिनींनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर ड्रोन तयार करून राष्ट्रीय स्तरावर ‘ड्रोन चलेंज’मध्ये सहभाग नोंदवत अडीचेशे ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजनाच्या ड्रोनचे सादरीकरण करण्यात यश मिळविले. या प्रकल्पातील ‘अ‍ॅडव्हानसिंग इंडिया विथ ड्रोन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’साठी पारितोषिक मिळाले आहे.

असून, भारतातील अव्वल ३० प्रोजेक्टमध्ये त्याची निवड झाली आहे.
ड्रोनचे कार्य
विद्यार्थ्यांनी केलेला ड्रोन सुमारे २५० ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचा असून, त्याचा वापर ‘सुरक्षा व्यवस्थापन’, तसेच आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये जीवनावश्यक ‘वस्तू वितरण’ यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून ‘नावीन्यपूर्णत: व प्रकल्पाचे सामाजिक परिणाम यासोबत येणाऱ्या समस्यांची ओळख यासोबतच सादरीकरण कौशल्ये आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूपतेवर’ आधारित या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षक प्रतीक गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Child Artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.