‘चिक्की’ तर वाटली, पण संख्या गुलदस्त्यात
By Admin | Updated: July 5, 2015 01:05 IST2015-07-05T01:05:27+5:302015-07-05T01:05:55+5:30
शेंगदाणा चिक्की दर्जेदार आल्याचा दावा

‘चिक्की’ तर वाटली, पण संख्या गुलदस्त्यात
नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या कथित चिक्की खरेदीतून नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागालाही शेंगदाणा चिक्कीचा पुरवठा झाला खरा, मात्र नेमका किती पुरवठा झाला, याची माहिती संबंधित विभागाने अद्याप उघड केलेली नाही. फेब्रुवारी महिन्यातच चिक्की खरेदीबाबत दरकरार निश्चित झाला. एप्रिल महिन्यात नाशिक जिल्'ात या खरेदीतील राजगिरा लाडूसह अन्य न्युट्रोशियनयुक्त खाद्यपदार्थ तसेच ताट, वाट्या आणि पाणी शुद्धीकरण यंत्रांपैकी कसलाही पुरवठा झाला नसल्याचे कळते. शेंगदाणायुक्त चिक्कीचा मात्र जिल्'ातील चार हजार ७७६ अंगणवाड्यांना पुरवठा झाल्याचा दावा प्रशासनाने केला असून, एका अंगणवाडीला नेमकी किती चिक्कीची पाकिटे पाठविण्यात आली. ती अंगणवाडीपर्यंत की तालुकास्तरावरच वाटप करण्यात आली, याची सविस्तर माहिती मात्र संबधित विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे हे काल शाळाबा' विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या कामात असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. जिल्'ातील साडेचार हजारांहून अधिक अंगणवाड्यांना या राज्यस्तरीय चिक्की खरेदीतून तालुका स्तरावर प्रत्येकी तीन केंद्र उभारून पुरवठा करण्यात आला. जिल्'ात कुठेही चिक्कीबाबत तक्रार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र नेमकी किती चिक्कीची पाकिटे आली, एकेका अंगणवाडीला किती चिक्कीचा पुरवठा करण्यात आला, याबाबत सविस्तर माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या टीएचआर (टेक होम रेशन) योजनेतील पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली होती. चिक्कीच्या गुणवत्तेबाबत नजीकच्या नंदुरबार व जळगाव जिल्'ात तक्रारी असताना नाशिकला मात्र दर्जेदार चिक्की आल्याचा दावा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)