शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बनावट नोटा प्रकरणी मुख्य संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 22:41 IST

सुरगाणा : बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चारजणांना अटक करण्यात आली असून, यात आतापर्यंत एकूण सातजणांना अटक झाली आहे. दरम्यान, संशयितांकडून छपाई केलेल्या ५०० आणि १०० च्या बनावट नोटा, एक स्कोडा कार व साहित्य असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत सातजण ताब्यात : ९ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

सुरगाणा : बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चारजणांना अटक करण्यात आली असून, यात आतापर्यंत एकूण सातजणांना अटक झाली आहे. दरम्यान, संशयितांकडून छपाई केलेल्या ५०० आणि १०० च्या बनावट नोटा, एक स्कोडा कार व साहित्य असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तालुक्याच्या सीमावर्ती भागात बनावट शंभरची नोट देऊन फक्त १० ते २० रुपयांची खरेदी करून या बनावट नोटा व्यवहारात आणत असल्याचे काही दिवसांपूर्वी उंबरठाण येथे उघडकीस आले होते. त्यावेळी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या येवल्यातील हरीष गुजर व बाबासाहेब सैद या दोघांना सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आणखी नावे समोर आल्याने अक्षय राजपूत यास येवल्यातून ताब्यात घेण्यात आले. सध्या हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत, तर यात सहभागी असलेला व २० वर्षांपासून प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करणारा मुख्य संशयित आरोपी किरण बाळकृष्ण गिरमे (४५, रा. विंचूर) याच्यासह प्रकाश रमेश पिंपळे (३१) रा. येवला, राहुल चिंतामण बडोदे (२७) रा. चांदवड, आनंदा दौलत कुंभार्डे (३५) रा. चांदवड यांना अटक करून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरलेले साहित्य प्रिंटर, कॉम्प्युटर, आदी साहित्यांसह १०० रुपयांचे पाठपोट छपाई केलेले १७७ कागद व ५०० रुपयांचे छपाई केलेले २६५ कागद, आदी मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवस-रात्र एक करून या बनावट नोटा प्रकरणी यशस्वी तपास करून सातजणांना अटक केली आहे. यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, एएसआय प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, पोलीस नाईक पराग गोतुरणे, पोलीस शिपाई संतोष गवळी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एसआय रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार हनुमंत महाले, वसंत खांडवी, आदींनी या तपासकामी परिश्रम घेतले.इन्फोएका कागदावर चार नोटा प्रिंटएका कागदावर चार बनावट नोटा प्रिंट केल्या आहेत. शंभराच्या ८८ हजार २००, तर ५०० च्या पाच लाख तीस हजार बनावट नोटा आहेत. स्कोडा कारसह ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चौघांना सोमवारी (दि. १३) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता यातील प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, मुख्य संशयित किरण गिरमे व आनंदा कुंभार्डे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांपैकी सर्वप्रथम दोघांना अटक केली होती. आता यामध्ये सातजणांना अटक झाली आहे. मुख्य आरोपी विंचूर येथील असून, पुढील तपास चालू आहे.- संदीप कोळी, पोलीस निरीक्षक.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी