कॉँग्रेसच्या बेपत्ता नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांकडून शोध
By Admin | Updated: September 12, 2014 00:31 IST2014-09-12T00:31:56+5:302014-09-12T00:31:56+5:30
कॉँग्रेसच्या बेपत्ता नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांकडून शोध

कॉँग्रेसच्या बेपत्ता नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांकडून शोध
नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून कॉँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक बेपत्ता आहेत. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करताच त्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना या नगरसेवकांचा कसून शोध घेण्याच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे, या घडामोडींशी संबंधित एका आमदाराशी संपर्क साधण्यात आला; परंतु त्यांनी हात वर केले.
महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस पक्षाचे आधी दोन आणि नंतर तीन असे पाच नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, एका फुटीर नगरसेवकाच्या पतीने आम्ही एका आमदाराचे समर्थक असल्याने शिवसेनेला मतदान करू, असे सांगितले.