शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:25 AM

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सोमवारी (दि.२३) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्र ांती मोर्चाने आंदोलन अधिक तीव्र करीत बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक दिली आहे.

नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सोमवारी (दि.२३) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्र ांती मोर्चाने आंदोलन अधिक तीव्र करीत बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्यामुळे वर्षभरानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा घुमणार आहे. दरम्यान, मराठा समाजाने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची महापूजा करण्यापासून रोखले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले असून, फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी तसेच मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा देण्याची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. औरंगाबाद येथे मराठा समाजाच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानंतर मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनासोबतच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती; परंतु नाशिक-त्र्यंबकेश्वरहून हजारोच्या संख्येने आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी परतत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी नाशिक जिल्हा  क्रांती मोर्चाने संयमी भूमिका घेत बुधवारपासून आंदोलन करण्याचा निर्णय नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.२४) येथील वरदलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळी सहा वाजेपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्णात कडकडीत बंद पाळला जाणार असून, मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे या मोर्चातही सर्व समाजबांधवांसह व्यापारी व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखण्यात येणार असून, याच ठिकाणी सरकारला उद्देशून द्यावयाचे निवेदन लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी मराठा समाजाने राज्यभरात ५७ मूक मोर्चे काढून मुंबईत महामोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. परंतु, सरकारने आतापर्यंतची निवेदने गांभीर्याने घेतली नसून, केवळ निवेदनाची प्रत प्रवेशद्वारावर चिटकविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच गुरुवारपासून आमदार व खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असून, यापुढे मराठा क्रांती मोर्चातर्फे ठोक आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, शिवाजी सहाणे, मधुकर कासार, राजेश शेळके, राजू देसले, उमेश शिंदे, पूजा धुमाळ, माधुरी पाटील, मयूरी पिंगळे, अस्मिता देशमाने, आर. डी. धोंगडे, रत्नाकर चुंभळे, सुरेश कमानकर, आशिष हिरे, शिवाजी मोरे उपस्थित होते.राजकीय नेत्यांची बैठकीकडे पाठमराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनात आणि बैठकांना प्रकाशझोतात येण्यासाठी धडपडणाऱ्या राजकीय नेत्यांसह मराठा समाजाचे आमदार व खासदारांसह स्थानिक संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी मंगळवारच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्हा बंद आंदोलनाच्या नियोजन बैठकीत राजकीय नेत्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आमदार, खासदारांनीही राजीनामे द्यावेत अन्यथा या आमदार, खासदारांना जिल्हाबंदी करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.नियम पाळण्याचे आवाहनमराठा समाजाच्या आरक्षणाला सर्व समाजांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अन्य समाजांविरोधात कोणीही घोषणाबाजी करू नये. त्याचप्रमाणे आंदोलनाला हिंसक वळण लागेल असे कृत्य कोणीही करू नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्याचप्रकारे आंदोलनादरम्यान कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. त्याचप्रमाणे मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. त्यामुळे कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करू नये, अशा सूचना मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीत देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा