शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाचा केक कापून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:05 IST

महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दपूर्तीसाठी महापालिकेत बैठक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतु वर्षभरात नाशिककरांच्या हाती काहीच लागले नाही.

नाशिक : महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दपूर्तीसाठी महापालिकेत बैठक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतु वर्षभरात नाशिककरांच्या हाती काहीच लागले नाही. याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने नाशिकरोड महापालिका कार्यालयाबाहेर केक कापण्यात आला.  नाशिककरांनी दत्तक नाशिकच्या भरोशावर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी २८ मे २०१७ रोजी महापालिकेत देखाव्यासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीत दत्तक नाशिककरिता अनेक मोठे प्रकल्प येतील तसेच नाशिककरिता भरघोस निधी मंजूर होईल याकरिता नाशिककरांचे डोळे या बैठकीकडे लागले. परंतु एक वर्ष पूर्ण होत झाले असताना आजतागायत रोजगार निर्मितीसाठी एकही मोठा प्रकल्प नाशिकमध्ये आला नाही. याची जाणीव करून देण्यासाठी केक कापण्यात आल्याचे राष्ट्रवादी माथाडी कामगारचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी सांगितले.  याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मुकेश शेवाळे, राष्ट्रवादी माथाडी शहराध्यक्ष गणेश पवार, गणेश गांगुर्डे, प्रवीण साळुंखे, तुषार दोंदे, अक्षय विभुते, आकाश अहिरे, योगेश बीडगर, रविराज कांगने, तुषार अहिरे, नीलेश कोथमिरे, आकाश खैरनार, सचिन गायकवाड, उत्तम पगारे आदी उपस्थित होते.‘फसवनीस सरकार हाय हाय’, ‘दत्तक नाशिकला सावत्रपणाची वागणूक देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपाला मत द्या, मी नाशिक दत्तक घेतो’ अशी घोषणा केली होती.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेस