शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:10 IST2017-09-10T23:49:40+5:302017-09-11T00:10:01+5:30
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये आवश्यक ते बदल करीत विद्यार्थी व शिक्षक हिताचा विचार करून शासन निर्णयात दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, अशी माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
झोडगे : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये आवश्यक ते बदल करीत विद्यार्थी व शिक्षक हिताचा विचार करून शासन निर्णयात दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, अशी माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
मंत्रालयात राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ग्रामविकास विभागाने शिक्षकांचे नवीन बदली धोरण जाहीर केले आहे. या नवीन बदली धोरणामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रसंगी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, उपनेते एन. वाय. पाटील, महेंद्र जानगुडे, सुधीर वाघमारे, परंडा, सोमनाथ तेलुरे, आर. के. खैरनार, सुभाष अहिरे, विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाटे आदी पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले. बदल्यांबरोबरच १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन लागू करावी, संगणक प्रशिक्षण मुदतवाढीचे पत्र त्वरित काढावे, दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू करावा, जिल्हा परिषदेच्या शाळेला मोफत विद्युत पुरवठा करावा, दर्जावाढ दिलेल्या विषय शिक्षकांना प्राथमिक पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी द्यावी, धान्यादि वस्तूचा पुरवठा शासनाकडूनच करावा आदी विषयावर चर्चा केली. सर्व मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेत सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी दिला जाणारा खो राहणार नाही, संवर्ग १ व २ यांच्या पसंतीक्रमाने बदल्या होणार, संवर्ग ३ च्या बदल्या संवर्ग १ व संवर्ग २ यांच्या बदलीमुळे रिक्त होणाºया व पूर्वी रिक्त असलेल्या जागेवर होणार, संवर्ग ४ च्या बदल्या होणार नाहीत अंतरजिल्हा बदलीच्या दुसºया टप्प्यातील बदल्या नोव्हेंबरमध्ये करणार असल्याचे तांबारे यांनी त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळास यावेळी सांगितले.