मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

By Admin | Updated: May 27, 2017 00:39 IST2017-05-27T00:39:07+5:302017-05-27T00:39:18+5:30

नाशिक : शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त होणार आहे.

Chief Minister will inaugurate the inauguration | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त होणार आहे. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील सभागृहात रविवारी (दि. २८) हा उद्घाटन सोहळा रंगणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाळेच्या सभागृहाचे नामकरण व शतक महोत्सव प्रदर्शनाचेही उद्घाटन होणार आहे. दाबक यांनी सांगितले की, दिवंगत शि. अ. अध्यापक, ल. पां. सोमण, रं. कृ यार्दी, वा. वि. पाराशरे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १ मे १९१८ रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना केली असून, १ मे २०१७ ला संस्थेने शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेतर्फे १ मे २०१७ ते १ मे २०१८ या कालावधीत शतकमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या शतकमहोत्सवी समितीचे उपाध्यक्ष विनायक गोविलकर, डॉ. सुनील कुटे, नवनाथ गोरवाडकर, श्रीपाद देशपांडे, वैशाली गोसावी आदींनी केले.

Web Title: Chief Minister will inaugurate the inauguration