अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी विजयश्री चुंबळे यांचे मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना साकडे
By Admin | Updated: November 18, 2014 00:43 IST2014-11-18T00:43:57+5:302014-11-18T00:43:57+5:30
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी विजयश्री चुंबळे यांचे मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना साकडे

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी विजयश्री चुंबळे यांचे मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना साकडे
नाशिक : जिल्'ात अवकाळी पावसामुळे नाशिक, येवला, पेठ, इगतपुरी, कळवण, बागलाण, देवळा, सुरगाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, मालेगाव व नांदगाव तालुक्यात १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांसह कांदा, हरभरा, द्राक्षे, डाळिंब, मका,भात, टमाटा, स्ट्रॉबेरी, मिरची व भाजीपाला आदि हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तकीमुळे जिल्'ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचप्रमाणे द्राक्षबागा, डाळिंबबागा कोलमडून पडल्या असून, कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसानग्रस्त भागातील शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांचे यावर्षीचे पीककर्ज माफ करण्यात यावे आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.(प्रतिनिधी)