शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, फलकबाजीने तापले वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:16 IST

राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, असे या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑ प्रभारी सरोज पांडे यांनी जाहीर करून चोवीस तास उलटत नाही तोच शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या मुख्यालयासमोरच फलकबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा टोला लगवण्यात आला.

ठळक मुद्देभाजपा नाराज : हा बालीशपणा असल्याची बाळासाहेब सानप यांची टीका

नाशिक : राज्यात भाजपाचाचमुख्यमंत्री होणार, असे या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑ प्रभारी सरोज पांडे यांनी जाहीर करून चोवीस तास उलटत नाही तोच शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या मुख्यालयासमोरच फलकबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा टोला लगवण्यात आला. मंगळवारी (दि.१६) हा प्रकार उघड झाल्यानंतर संंबंधित नगरसेविकेने फलक काढून घेतला असला तरी त्यातून उभय पक्षात धुसफूस वाढली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी हा निव्वळ बालीशपणा असल्याची टीका केली आहे, तर शिवसेनेच्या नेत्यांनी मौन बाळगले आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यात सोमवारी (दि.१५) नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजपाच्या महाराष्टÑ प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांच्या विधानाची भर पडली. दोन्ही पक्षांची युती असली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेने कल्पना विलास सोडावा अशी कोपरखळी त्यांनी मारली. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच मंगळवारी (दि.१६) भल्या सकाळीच शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी वसंत स्मृती तसेच या ठिकाणी एन.डी. पटेलरोडवर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे फलक लावून भाजपाला खिजवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने हे फलक काढून घेण्यात आले तरी या फलकबाजीने वादात भर पडली आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे, एवढीच प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केली, तर भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी हा बालीशपणा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.सेना नेत्यांचे हात वरसदर फलकबाजी संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी हात वर करीत यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, मनपा विरोधी पक्षनेतेअजय बोरस्ते यांनीयासंदर्भात प्रतिक्रिया देण्याचेही टाळले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री