रस्त्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: May 23, 2014 01:10 IST2014-05-23T00:27:26+5:302014-05-23T01:10:14+5:30

नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारी अंतर्गत शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचा दर्जा तपासावा आणि प्रसंगी महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडे घातले.

Chief Minister to probe the roads | रस्त्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

रस्त्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारी अंतर्गत शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचा दर्जा तपासावा आणि प्रसंगी महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडे घातले.
पाटील यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. पुढील वर्षी नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ३५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील २१८ कोटी रुपये नाशिक महापालिकेस देण्यात आले आहेत. महापालिकेने विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्याच्या कामांना प्रारंभ केला असल्याचे दाखवले आहे. तथापि, मागील कुंभमेळ्यातीलच हे रस्ते असून, या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जात आहे. त्यातच महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांची तज्ज्ञांमार्फत चौकशी करावी आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका बरखास्त करून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
...छायाचित्र आर वर फोटोमध्ये दशरथ पाटील नावाने सेव्ह आहे.

Web Title: Chief Minister to probe the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.