शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:04 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील दौºयावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील दौºयावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.  गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ आटोपून फडणवीस दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरने ओझर विमानतळावर येतील व तेथून मोटारीने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होतील. संत श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन तसेच नवीन भक्तनिवासाचे उद्घाटन दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर चार वाजून १० मिनिटांनी मोटारीने डोंगरे वसतिगृहात भरलेल्या शेल्टर प्रदर्शनास भेट देतील. या ठिकाणी फडणवीस एक तास थांबतील. त्यानंतर मोटारीने ओझर विमानतळाकडे रवाना होतील. पाच वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे रवाना होतील.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौºयाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतर होऊन भाजपाच्या हाती सत्ता मिळाल्याने यावेळी नगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकChief Ministerमुख्यमंत्री