मुख्यमंत्री फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर
By Admin | Updated: January 17, 2016 23:12 IST2016-01-17T23:12:04+5:302016-01-17T23:12:41+5:30
मुख्यमंत्री फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. १८) जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे. सकाळी ९.२० वाजता देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. ९.३० वाजता ते कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर १०.४५ वाजता मोटारीने विठेवाडी हेलिपॅडवर आगमन आणि १०.५५ वाजता मुंबर्ईकडे प्रयाण असा त्यांचा दौरा आहे.