शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतक-यांचे काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 18:30 IST

समांतर रस्त्याच्या बाजूने संरक्षक जाळ्यांच्या ठिकाणी बघ्यांच्या स्वरुपात येऊन उभे राहिले. फडणवीस यांचा ताफ्यामधील पोलीस वाहनांचा सायरन ऐकू येताच शेतकरी सावध झाले आणि वाहने जवळ आल्यानंतर दहा ते बारा शेतक-यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले.

ठळक मुद्देपोलिसांनी शेतक-यांना ताब्यात घेतल्याची माहिती कोणार्कनगर परिसरात चौफूलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर दौ-यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला मंगळवारी (दि.२६) मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर येथे शेतक-यांनी काळे झेंडे दाखविले. शेतक-यांना ‘दलाल’ संबोधल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविले.ओझर विमानतळावर फडणवीस यांचे दुपारी आगमन झाले. मोटारीने त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नाशिकमार्गे निघाला असता महामार्गावर कोणार्कनगर परिसरात चौफूलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध व्यक्त केला. समृध्दीबाधित शेतक-यांचा एक गट येथील एका हॉटेलमध्ये चहापानासाठी जमला व त्यानंतर अचानाकपणे चौफुलीवरील जोड रस्त्यांची वाहतूक ताफ्याला मार्गस्थ होण्यासाठी पोलिसांकडून थांबविली गेली. शेतकरी सतर्क होत हॉटेलमधून एक-एक करुन बाहेर पडले आणि चौफूलीवरील समांतर रस्त्याच्या बाजूने संरक्षक जाळ्यांच्या ठिकाणी बघ्यांच्या स्वरुपात येऊन उभे राहिले. फडणवीस यांचा ताफ्यामधील पोलीस वाहनांचा सायरन ऐकू येताच शेतकरी सावध झाले आणि वाहने जवळ आल्यानंतर दहा ते बारा शेतक-यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. सदर बाब बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संबंधित शेतक-यांना ताब्यात घेत आडगाव पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिकFarmerशेतकरी