मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात
By Admin | Updated: June 27, 2015 00:23 IST2015-06-27T00:23:13+5:302015-06-27T00:23:52+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि.२७) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वच्छता संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता ओझर येथील विमानतळावर त्यांचे आगमन होईल. तेथून मोटारीने ते जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ आढावा बैठकीसाठी प्रयाण करतील. पावणे तीन वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ आढावा बैठक, चार वाजता भोसला मिलिटरी स्कूल येथे महाराष्ट्र स्वच्छता संकल्प कार्यक्रमास हजेरी, सहा वाजता गिरणारे येथील जी.पी.फार्म येथे भेट सेऊन ते सात वाजता ओझर विमानतळ येथे रवाना होतील. पावणे आठ वाजता ओझर विमानतळावरून ते विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. (प्रतिनिधी)