ंजिल्हा परिषदेत मुख्य लेखाधिकारी रुजू

By Admin | Updated: June 21, 2014 00:59 IST2014-06-21T00:34:55+5:302014-06-21T00:59:20+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी मुंबईहून बदली झालेले रा. सो. महाले यांनी शुक्रवारी (दि. २०) आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.

The Chief Accounts Officer, RJU, at Zilla Parishad | ंजिल्हा परिषदेत मुख्य लेखाधिकारी रुजू

ंजिल्हा परिषदेत मुख्य लेखाधिकारी रुजू

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी मुंबईहून बदली झालेले रा. सो. महाले यांनी शुक्रवारी (दि. २०) आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. गेल्या साडेतीन वर्षांपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांची नाशिकहून मुंबईला संचालक (लेखा) धर्मादाय आयुक्त, वरळी येथे बदली झाली आहे. दोेनच दिवसांपूर्वी वित्त विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील वर्ग-१ श्रेणीतील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले होते. त्यात नाशिकला कार्यरत असलेले महाजन यांना साडेतीन वर्षे झालेली असताना, त्यांना आणखी वर्षभर मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता; मात्र मुख्यमंत्र्यांनी तो नाकारल्याचे कळते. महाजन यांच्या जागी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अर्थ सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी रा. सो. महाले यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बदली झाली आहे. महाले यांनी नाशिकला बदली झाल्यानंतर तत्काळ शुक्रवारी (दि. २०) त्यांच्या पदाची सूत्रे स्वीकारली. (प्रतिनिधी)

Web Title: The Chief Accounts Officer, RJU, at Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.