सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:13 IST2018-03-26T00:13:13+5:302018-03-26T00:13:13+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर रविवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारची सुट्टी, श्रीरामनवमी आणि चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे आज सप्तशृंगगडावर देवीभक्तांनी एकच गर्दी केली होती. हजारो देवीभक्तांनी मनोभावे पूजन करून देवीचरणी नतमस्तक झाले.

सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाला प्रारंभ
कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर रविवारपासून प्रारंभ झाला असून, रविवारची सुट्टी, श्रीरामनवमी आणि चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे आज सप्तशृंगगडावर देवीभक्तांनी एकच गर्दी केली होती. हजारो देवीभक्तांनी मनोभावे पूजन करून देवीचरणी नतमस्तक झाले. सकाळी सात वाजता प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यू. एम. नंदेश्वर, विधि सेवा प्राधिकरण, नाशिक न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश बुके, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाभळे, संदीप बेनके पाटील, सरपंच राजेश गवळींसह विविध विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत महापूजा होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला.