छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

By Admin | Updated: March 19, 2017 00:04 IST2017-03-19T00:03:49+5:302017-03-19T00:04:01+5:30

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Chhatrapati Shivrajaya's triple cheerleader | छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बीर्इंग राधे ग्रुपच्या वतीने कॉलेजरोड येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वरानंद महाराजांनी उपस्थित युवकांशी संवाद साधला. यावेळी राधे जगताप, सनी काळे, आकाश मोराडे, सुमीत सानप, अक्षय दीक्षित, श्रमिक त्रिभुवन, गणेश पानपाटील, प्रांजल पाटील, सिद्धेश कुमार, मनोज गायकवाड, दर्शन झवर, मुन्ना राय, मंगेश पवार आदि उपस्थित होते.
वाल्मीकी टॉट्स शाळा
वाल्मीकी टॉट्स शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी सर्व मुलांना शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगण्यात आली. यावेळी संचालक सिमांतिनी कोकाटे, संस्थापक सीमा कोकाटे, मुख्याध्यापक मोनिका गोडबोले- यशोद, व्यवस्थापक सीमा कोतवाल आणि शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
शिवसेवा युवक मित्रमंडळ
शिवसेना प्रणित शिवसेवा युवक मित्रमंडळ, संत गाडगे महाराज चौक, भद्रकालीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, मंडळाचे अध्यक्ष संदीप कानडे, उपाध्यक्ष कुंदन दळे, कार्यकारी अध्यक्ष सचिन बांडे, युवा सेना सरचिटणीस ऋतुराज पांडे, सचिन भालेकर, संदेश फुले, हेमंत उन्हाळे, निलेश इंगळे, संजय परदेशी, राजेंद्र कुलथे, अनिल क्षत्रिय, दीपक चौघुले, जय दाते, गोरख पाटील, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Shivrajaya's triple cheerleader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.